मकर संक्रांतीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे.
मकर संक्रातीच्या काळात खणांना मोठी मागणी असते.
त्यामुळे धाराशिव तालुक्यातील सारोळा बुद्रुक येथील हनुमंत कुंभार यांच्या घरी देखील संक्रातीचे खण बनवण्याची लगबग सुरू आहे.
हनुमंत कुंभार खण बनवण्यासाठी लागणारी माती पंढरपूरहुन आणतात.
खण बनवण्यासाठी माती चाळून पाण्यात भिजवली जाते.
त्यानंतर ती माती तुडवून एका चाकावर तुडवलेल्या चिखलाच्या गोळ्याला आकार दिला जातो आणि खण बनवले जातात.
संक्रांतीच्या सणासाठी, खण, झाकण्या बनवल्या जातात. धाराशिव शहरात विक्री केली जाते, असं हनुमंत कुंभार यांनी सांगितलं.