धाराशिव जिल्ह्यातील कुंथलगिरीच्या खव्याला केंद्र सरकारकडून( जीआय) म्हणजेच भौगोलीक मानांकन देण्यात आलय.
1972 ला या परिसरातील शेतकऱ्यांनी शेतीला जोड व्यावसाय म्हणून दुधापासून खवा आणि खव्याचा पेढा बनवण्यास सुरूवात केली.
सोलापूर धुळे महामार्गावरती कुंथलगिरी फाट्यावर सुरूवातीला दोन ते तीन ठिकाणी चालणारा हा खवा व पेढा विक्रीचा व्यावसाय आज देश पातळीवर जावून पोहचलाय.
कुंथलगिरी परीसरातील काही शेतकऱ्यांनी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय सुरू केला.
दुधाचा खवा आणि पेढा बनवून तो विकण्यास सुरुवात केली. पुढे परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी हाच मार्ग निवडला.
आता खवा आणि पेढा बनवणे हाच या परिसरातील मुख्य व्यवसाय बनलाय.
येथील खव्याची पौष्टिकता आणि दर्जा पाहून केंद्र सरकारने याला जीआय मानंकन दिलंय.