गावची तहान भागवणारा जलदूत!

यंदा मराठवाड्यात पाऊस कमी झाल्याने ऐन दिवाळीच्या आधीपासूनच जलसंकट निर्माण झाले आहे.

विविध ठिकाणी असणारे जलस्त्रोत आटल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागतेय.

धाराशिव जिल्ह्यातील वालवड हे 5 हजार लोकवसतीचं गाव आहे.

गावातील पाणीप्रश्न गंभीर बनला होता.

तेव्हा गावातीलच सिद्धेश्वर सावंत हे जलदूत बणून पुढे आले आणि त्यांनी स्वत:च्या बोअरवेलचं पाणी गावाला दिलं.

त्यामुळे ग्रामस्थांची पाण्यासाठी होणारी वणवण थांबली आहे.

15 गुंठे मिरचीच्या शेतीतून लखपती!