अलिकडे पारंपरिक शेतीला फाटा देत अनेक शेतकरी आधुनिक शेतीकडे वळत आहेत. यात महिला शेतकरीही आघाडीवर आहेत.
धाराशिव जिल्ह्यातील जांबच्या शेतकरी प्रियांका अजिनाथ बोडके यांनी पती निधनानंतरही हार मानली नाही.
आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेती सुरूच ठेवली. आता 15 गुंठे मिरचीच्या शेतीतून त्यांनी एक लाखाचं उत्पन्न घेतलं आहे.
त्यांचा हा प्रवास अनेक शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे.
भूम तालुक्यातील जांब येथील प्रियांका बोडके यांचे पती अजिनाथ बोडके यांचं अकाली निधन झालं.
पण शेतकरी कुटुंबातील प्रियांका यांनी हार मानली नाही. कुटुंबाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत आधुनिक पद्धतीनं शेती सुरू केली.
पॉलिहाऊस मध्ये मल्चिंग पेपरवर आणि ठिबक सिंचनाच्या सहाय्याने 15 गुंठे मिरचीची लागवड केली.
आता याच शेतीतून त्या लाखोंची कमाई करत आहेत. यासाठी त्यांना भाऊ आणि सासूचं सहकार्य मिळतंय.