रक्षाबंधनासाठी गिफ्ट ‘इथं’ फक्त 30 रुपयांपासून 

रक्षाबंधनाचा सण आता जवळ येतोय. बहिण-भावाच्या प्रेमाचं प्रतिक असलेला हा दिवस आहे.

डोंबिवलीमधल्या मधुबन गल्लीत बहिणीला गिफ्ट देण्यासाठी बरेच ऑप्शन आहेत.

तुमची बहिण कितीही लहान किंवा मोठी असेल तरी तिला मेकअपचं साहित्य नक्कीच आवडत असेल.

शॉपिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या या मधुबन गल्लीत लिपस्टिक, मेकअप बॉक्स, काजळ, नेलपेंट, आयलायनर असे अनेक पर्याय आहेत.

यापैकी एक किंवा काही वस्तू तुम्ही रक्षाबंधनाला भेट देऊ शकता.

रोजच्या वापरासाठी लागणारे कुर्ती किंवा टॉप्स या गल्लीत 250 रुपयांपासून उपलब्ध आहेत.

झुमके हे कोणत्याही बहिणीचा आवडीचा दागिना आहे.

लहान किंवा मोठे झुमके, डायमंडचे झुमके, कॉर्पोरेट लुक देणारे छोटे कानातले हे इथं खरेदी करू शकता.

अगदी 30 रुपयांपासून याची सुरुवात होते. हा एक गिफ्टसाठी सहज आणि सोपा पर्याय आहे.