गौराईसाठी स्वस्तात मस्त साडी
गौरी गणपती काही दिवसांवर येऊन ठेपले आहेत.
या निमित्तानं पुण्यातल्या बाजारपेठेत खास साड्या दाखल झाल्या आहेत.
विशेष म्हणजे यातील काही साड्यांची किंमत ही फक्त 100 रुपये आहे.
पुण्यातल्या रविवार पेठेत असणाऱ्या विजयालक्ष्मी दुकानात नवनवीन पद्धतीच्या साड्या गौरी गणपती सणानिमित्त आल्या आहेत.
साडी खरेदीसाठी रविवार पेठ एक चांगला पर्याय आहे.
गौरीच्या निमित्तानं या ठिकाणी तुम्हाला पैठणी, बालगंधर्व पैठणी, पेशवाई पैठणी, महाराणी पैठणी,बनारसी साडी, चंदेरी साडी मिळतील.
याच बरोबर खणाच्या साड्या,शालू साडी, नऊवारी साडी, कोटा सिल्क साडी मिळतील.