उन्हाळ्यात फ्रिजचं थंड पाणी पिताय? मग परिणामही वाचा

उन्हाळ्यात बाहेर उकाडा जाणवत असल्याने फ्रिजमधील थंड पाणी पिण्याकडे अनेकांचा कल असतो.

परंतु भर उन्हातून आल्यावर थंड पाणी प्यायल्याने तुमच्या शरीरावर त्याचे विपरीत परिणाम देखील होऊ शकतात.

थंड पाणी प्यायल्याने बद्धकोष्ठतेची समस्या होऊ शकते.

उन्हातून आल्यावर थंड पाणी प्यायल्याने आतडे आकुंचन पावतात ज्यामुळे पोट दुखीचा त्रास होऊ शकतो आणि पचनाशी निगडित समस्या निर्माण होऊ शकतात.

उन्हातून आल्यावर थंड पाणी प्यायल्याने हृदयाच्या ठोक्यांची गती कमी होते.

उन्हातून आल्यावर दररोज लगेच थंड पाणी प्यायल्याने हृदयविकाराचा धोका देखील जाणवू शकतो.

नेहमी थंड पाणी प्यायल्याने ब्रेन फ्रिज होण्याची समस्या उद्भवू शकते.

संशोधनातून असे समोर आले आहे की, थंड पाणी नसापर्यंत पोहोचताच ते मेंदूला संदेश देते. त्यामुळे डोकेदुखीचा त्रास सुरू होतो.

थंड पाणी प्यायल्याने बॉडीची मेटाबॉलिज्म सिस्टम स्लो होते. ज्यामुळे फॅट्स नीट रिलीज होऊ शकत नाहीत.

सतत थंड पाणी प्यायल्याने थकवा देखील येऊ शकतो.

बातमी वाचण्यासाठी हेडिंगवर क्लिक करा