प्लास्टिक किंवा पेपर कपमधून चहा पिणे का टाळावे?

हिवाळा असल्याने चहाप्रेमी दिवसातून 2 ते 3 वेळा टपरीवर चहा पिण्याचा आनंद घेतात.

हिवाळ्यात चहा पिणे जरी शरीराला उब देण्यासाठी फायदेशीर आहे.

पण चहा ज्या प्लास्टिक किंवा पेपर कपमधून दिला जातो त्यातून चहा पिणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकत.

प्लॅस्टिकच्या कपमध्ये चहा किंवा कोणतेही गरम पेय प्यायल्याने प्लास्टिकचे कण त्यात विरघळू लागतात.

काही प्लास्टिकचे कप बिस्फेनॉल A (BPA) किंवा phthalates सारख्या हानिकारक रसायनांचा वापर करून तयार केले जातात.

अशी रसायने गरम चहामुळे वितळलयास त्याचा आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो.

प्लास्टिक शरीरासाठी घातक म्हणून अनेकजण पेपर कपमधून चहा पितात.

परंतु चहा पिण्यासाठी पेपर कप वापरणे देखील धोकादायक ठरते.

पेपर कप तयार करण्यासाठी प्लास्टिक किंवा मेणाचे कोटिंग केले जाते.

पेपर कपमध्ये गरम चहा प्यायल्यास कप तयार करण्यासाठी वापरण्यात आलेले हानिकारक रसायन त्यात मिसळू शकतात.

हानिकारक घटक मिसळलेला चहा तुम्ही प्यायल्यास त्याचा आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो.