तुम्हीही एअरपोर्टवरचे वायफाय वापरता? सावधान! ही चूक पडेल महाग 

तुम्ही विमानतळावर सार्वजनिक वाय-फाय वापरत अस्सल तर तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे.  

विमानतळ असो किंवा इतर कोणतेही अनोळखी ठिकाण, तेथील वायफाय वापरताना काळजी घेणं आवश्यक आहे. 

कारण यामुळे तुमच्या स्मार्टफोन किंवा लॅपटॉपवर सायबर अटॅक सहज होऊ शकतो.

तज्ञांच्या मते, सार्वजनिक वाय-फाय असुरक्षित आहे. कारण त्याद्वारे तुमच्या मोबाईलमध्ये प्रवेश करणे सोपे होते. 

याचा वापर करून हॅकर्स तुमच्या मोबाईलमधील अ‍ॅक्टिव्हिटीचा मागोवा घेऊ शकतात.

अशा परिस्थितीत तुमचा वैयक्तिक डेटा चोरीला जाण्याची भीती असते.

जर तुम्हाला पब्लिक वाय-फाय वापरायचे असेल तर त्याची सेवा नक्की पहा.

सार्वजनिक वाय-फाय वापरताना सर्व शेअरिंग बंद करा.

या कालावधीत कोणत्याही प्रकारचे व्यवहार किंवा वैयक्तिक माहिती शेअर करू नका.