उंच टाचेच्या चपला म्हणजेच हिल्स घालणे बहुतेक महिलांना आवडते.
मात्र गरोदरपणात हिल्स घालणं किती योग्य आहे असा प्रश्न वारंवार पडतो.
गरोदरपणाच्या सुरुवातीपासून ते बाळ दूध पित असे पर्यंत महिलांनी हिल्स वापरू नये असा सल्ला तज्ज्ञ देतात.
या मागे कोणतेही वैज्ञानिक कारण नाही मात्र गरोदरपणात स्त्रियांचं वजन वाढत आणि अशावेळेस हिल्स घातल्यास शरीराचं संतुलन बिघडून अपघात होण्याची शक्यता असते.
हिल्स घातल्याने पायांना क्रॅम्प्स येणे किंवा सूज येणे असे प्रकार घडू शकतात आणि गरोदरपणात यामुळे जास्त त्रास होऊ शकतो.
जास्तवेळ हिल्स घालत्याने पाठदुखीचाही त्रास होऊ शकतो.
अनेकदा हिल्स घालून बाळाला मांडीवर घेऊन बसण्यात अडचण होते.
तज्ज्ञांच्या मते, गरोदरपणाचे सुरुवातीचे तीन महिने महिलांनी सावधपणे चालावे. कारण याकाळात गर्भपात होण्याची शक्यता जास्त असते.
ऑफिसला जाणार्या स्त्रिया हलक्या टाचांच्या हिल्स घालू शकतात. पण त्याचा सावधपणे वापर करणे गरजेचे आहे.
गरोदरपणात हिल्स ऐवजी आरामदायक फ्लॅट चप्पल, सँडल किंवा शूज घालणे जास्त चांगले मानले जाते.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. गरोदर महिलांनी हिल्स वापरण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.)