लग्नानंतर काही जोडप्यांचे थोड्या दिवसांतच खटके उडायला सुरुवात होतात.
त्यामुळे काही जोडपी सातजन्मासाठी दिलेली वचन मोडून लगेच घटस्फोट घेण्याचा विचार करतात.
सध्या विविध कारणांमुळे घटस्फोटाच्या संख्येत वाढ झालेली आहे.
घटस्फोटाच्या दोन परिस्थीती असतात. एकामध्ये पती-पत्नी दोघांनाही घटस्फोट हवा असतो.
तर दुसऱ्या परीस्थीतीत दोघांपैकी एकानेच घटस्फोटासाठी याचिका दाखल केलेली असते. दोन्ही घटस्फोटांसाठी वेगवेगळे नियम असतात.
दिल्ली उच्च न्यायालयाचे वकील प्रेम जोशी सांगतात की, जर विवादित घटस्फोट म्हणजेच एकतर्फी घटस्फोट दाखल केला असेल तर तो लग्नाच्या एका दिवसानंतरही दाखल केला जाऊ शकतो.
या प्रकरणात, वेळेची मर्यादा नाही आणि जोडप्यांपैकी कोणीही त्यांना पाहिजे तेव्हा दाखल करू शकतात.
परस्पर घटस्फोट दाखल केला असेल तर त्यासाठी कालमर्यादा आहे.
जेव्हा पती-पत्नी दोघांनाही परस्पर संमतीने वेगळे व्हायचे असेल तर एक वर्ष एकत्र राहिल्यानंतर परस्पर घटस्फोट दाखल केला जाऊ शकतो.
त्यानंतरही कोर्टाकडून तडजोडीसाठी 6 महिन्यांची मुदत दिली जाते. एकदा 6 महिने पूर्ण झाल्यावर, कलम 13B अंतर्गत पुन्हा वेळ दिला जातो.
अनेकदा परिस्थिती पाहून वेळ न देताही घटस्फोट मिळू शकतो.
परंतू हे पूर्णपणे न्यायालयावर अवलंबून असते. न्यायालय यावेळी जोडप्यांची परिस्थीती पाहून घटस्फोटाचा जाहीर करतात.