‘इथं’ चक्क मिळतीय सोन्याचा वर्ख असलेली मिठाई

दिवाळी आणि फराळ हे समीकरण असून दिवाळीची कितीही तयारी केली तरी ती फराळाशिवाय पूर्ण होत नाही.

त्यामुळे दिवाळी सण खवय्यांसाठी पर्वणीच असतो.

खवय्यांच्या पर्यायात भर टाकणारी आणि तोंडाला पाणी सुटेल अशी खास सुवर्ण मिठाई सध्या पुण्यातील मार्केटमध्ये मिळत आहे.

या वर्षी ही दिवाळीसाठी गेल्या वर्षी प्रमाणे पुण्यातील चितळे बंधूनी सुवर्ण मिठाई चालू केली आहे.

सुवर्ण मिठाईचा दोन पीसचा बॉक्स 1600 रुपयाला आहे आणि आठ पीसचा बॉक्स आहे 6000 रुपयाला आहे.

हिजलनट आक्रोड, केशर, मध, पिस्ता अशा सगळ्या पदार्थाचा वापर यामध्ये बनवण्यासाठी केला जातो.

त्याच्या वर जो वर्ख लावला जातो तो प्युअर सोन्याचा व्हेजिटेरियन असतो, अशी माहिती व्यावसायिक संजय चितळे यांनी दिली आहे.

वजन झटक्यात कमी करतं हे पौष्टिक फळ