यादिवशी चुकूनही तोडू नका तुळशीच्या मंजरी
हिंदू धर्मात तुळशीचे विशेष महत्त्व आहे.
तुळशीला घरातील लक्ष्मीसुद्धा मानले गेले आहे.
घरात लावलेल्या तुळशीच्या रोपाला कार्तिक महिन्यात मंजरी येतात.
या मंजरीचे विशेष महत्त्व आहे.
आणखी वाचा
हिंदू धर्मात हे लाकूड जाळणे मानले जाते अशुभ, वंशाचा नाश करणारं ते लाकूड कोणतं?
नेहमी लोक नकळतपणे या मंजरीला रोपावरच सोडून देतात.
मात्र, ही मंजरी तुळशीच्या डोक्यावर ओझं मानली गेली आहे.
घरात तुळशीचे रोप असेल तर त्या घरात सुख समृद्धी वाढते.
तुमच्या घरात लावलेल्या तुळशीला मंजरी आल्यावर त्या तोडून टाकाव्या.
मंगळवारी आणि रविवारी तुळशीवर आलेल्या मंजरी तोडू नये, ही बाब लक्षात ठेवावी.