डेंग्यू झाल्यावर चुकूनही खाऊ नका 'हे' पदार्थ

पावसाळ्यात डेंग्यूच्या आजाराचा संसर्ग वाढतो. हा आजार मादा मच्छर एडीस एजिप्टीच्या चावल्याने होतो.

रोगप्रतिकार शक्ती कमकुवत असणाऱ्या व्यक्तीला हा आजार होण्याची जास्त शक्यता असते.

डेंग्यू झाल्यावर तीव्र ताप, त्वचेवर फोड येणे, सांधेदुखी, ब्लड प्लेटलेट्स कमी होणे, डोकेदुखी सारख्या समस्या जाणवतात.

डेंग्यूमध्ये कमी झालेले प्लेटलेट्स वाढवण्यासाठी रुग्णाला आवश्यक काळजी घेणे गरजेचे असते.

कॅफिन शरीराला ऊर्जा देते परंतु डेंग्यू झाल्यावर कॅफिनयुक्त पदार्थांचे सेवन करणे योग्य नाही.

पावसाळ्यात डेंग्यूच्या आजाराचा संसर्ग वाढतो. हा आजार मादा मच्छर एडीस एजिप्टीच्या चावल्याने होतो.

डेंग्यूमध्ये शरीराला भरपूर पाण्याची आवश्यकता असते. याउलट कॅफीनमुळे शरीर डिहायड्रेट होते. तेव्हा कॉफी, चहा, एनर्जी ड्रिंक पासून वाचले पाहिजे  

डेंग्यू झाल्यावर मसालेदार पदार्थांच्या ऐवजी हलके पदार्थ खायला हवेत. मसाल्यांमुळे पोटात ऍसिडिटी वाढून जळजळ होऊ शकते.

डेंग्यूमध्ये झाल्यावर मांसाहारी भोजन खाणे टाळावे. आजारात पाचनतंत्र हळू काम करत असल्याने मांसाहार पचण्यास वेळ लागतो.

डेंग्यूमुळे तुमची पाचन क्षमता कमी होते. तेव्हा दूध, तूप, बटर, पनीर इत्यादी पदार्थ खाणे टाळावे.

डेंग्यू झाल्यावर शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी पाणी, नारळ पाणी, ज्यूस, पालेभाज्यांचे सूप अश्या पदार्थांचा आहारात समावेश केला पाहिजे.