या गोष्टी करा आणि रागावर मिळवा ताबा!
अनेक लोकांना छोट्या छोट्या गोष्टींवरुन लगेच राग येतो. त्यामुळे भांडण आणि मनस्ताप अधिक वाढतो.
राग येणं ही नैसर्गिक गोष्ट आहे. मात्र यामुळे माणूस चिडचिड करतो, ओरडतो आणि अधिक विचार करतो.
More
Stories
Video Viral : SBI बॅंकेत अचानक शिरला बैल, पुढे घडलं असं की...
धक्कादायक प्रकरण: मुलगी लहान असताना घशात अडकला 1 रुपया, 13 वर्षानंतर काढला बाहेर
तुम्ही रागावर नियंत्रण ठेवू शकत नसाल तर ते तुमच्यासाठी हानिकारक आहे.
जेव्हा तुम्हाला वाटतं की राग नियंत्रणाबाहेर जात आहे, तेव्हा लगेच डोळे बंद करा आणि दीर्घ श्वास घ्या.
भरपूर राग येत असेल तर थंड पाण्यानं चेहरा धुवा. यामुळे शरीराची मज्जासंस्था मनाला व्यस्त ठेवते आणि राग कमी होतो.
योगासने आणि ध्यान नियमित केल्यानं रागावर नियंत्रण ठेवता येतं.
राग एखाद्या चुकीच्या व्यक्तीवर काढण्यापेक्षा पंचिंग बॅगवर काढा. ज्यासोबत बोलून चांगलं वाटतं त्यांच्याशी बोला.
तणावग्रस्त आणि थकलेले असल्यानर अधिक चिडचिड होते. शरीर तणावमुक्त असेल तरच ते निरोगी राहू शकते.
जेव्हा तुम्हाला खूप राग येतो तेव्हा तुमचे मन शांत करण्याचा प्रयत्न करा आणि पुरेशी झोप घ्या.