तुळशी विवाह दिवशी करा हा उपाय, तुमचंही होईल शुभमंगल..!

कार्तिक महिन्यातील एकादशीपासून शुभ कार्ये सुरू होतात.

प्रबोधिनी एकादशीनंतर दुसऱ्या दिवशी तुळशी विवाह केला जातो. यानंतर लग्नासाठी शुभ मुहूर्त मिळतात.

ज्यांचं लग्न जुळण्यात अडचणी येत आहेत, त्यांनी या दिवशी काही खास उपाय करावेत.

तुळशी विवाहाच्या दिवशी तुळशीला लाल रंगाची चुनरी अर्पण करा.

असे केल्याने इच्छित जीवनसाथी मिळतो, अशी धार्मिक श्रद्धा आहे.

या दिवशी एक हळकुंड, केशर गूळ आणि हरभरा डाळ पिवळ्या कपड्यात बांधून ठेवा.

या सर्व गोष्टी भगवान विष्णूच्या मंदिरात अर्पण करा.

अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी तुळशीला लग्नाचे साहित्य अर्पण करा.

पूजेनंतर हे श्रृंगार साहित्य कोणत्याही विवाहित महिलेला दान करा.

येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही