विदर्भातलं प्रति पंढरपूर माहित आहे का?
विदर्भातलं प्रति पंढरपूर माहित आहे का?
विदर्भातील प्रति पंढरी म्हणून त्रिवेणी संगमावर वसलेलं चंद्रपूर जिल्ह्यातील वढा हे ठिकाण ओळखळं जातं.

आषाढी-कार्तिकी एकादशीला इथे भक्तांची प्रचंड गर्दी होते.

पालखी, यात्रा, दिंडी, वारी,अशाप्रकारे भक्त आपल्या श्रद्धा भावना व्यक्त करत असतात.

याच ठिकाणी प्राचीन विठ्ठल रुख्मिणीची मूर्ती असून मोठी यात्रा भरते.

विठ्ठलाच्या पायी नतमस्तक होण्यासाठी विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून भाविक याठिकाणी येतात.

दररोज विठ्ठलाच्या आरती, पूजा स्वामी चैतन्य महाराजांकडून केली जाते. नैवेद्य दाखवला जातो.

मूर्तीला कपाळावर चंदनांचा टिळा, आणि ऋतूनुसार योग्य कपडे परिधान करून दिले जातात.

सध्या दररोज काकडा आरती होत असून भक्तांची उपस्थिती असते.

तीन दिवस चालणारी वढा यात्रा चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यातील विठ्ठल भक्तांसाठी विशेष महत्वाची आहे

आजपर्यंत गावात कधीही पूर आला नाही, हा विठ्ठल-रुक्माईचा आशीर्वाद आहे, अशी येथील ग्रामस्थांची श्रद्धा आहे.