क्रिकेटरांचा पगार किती असतो माहीत आहे का?

क्रिकेटरांचा पगार किती असतो माहीत आहे का?

गेल्या काही वर्षांत राजकारण आणि चित्रपटांसोबतच क्रिकेट हा खेळ भारतातील चर्चेचा महत्त्वाचा भाग म्हणून उदयास आला आहे.

एकेकाळी क्रिकेट हा सज्जनांचा खेळ मानला जात होता, भारतात या खेळाची मोहिनी आहे आणि त्यातील पैशाने भारतीय जनतेला प्रभावित केलं आहे.

भारतात क्रिकेटचा हा विकास फार सोपा नव्हता. 80 च्या दशकापूर्वी, कमी उत्पन्न आणि कमाईच्या क्षमतेमुळे हा खेळ करिअरसाठी चांगला पर्याय मानला जात नव्हता.

X वर एका यूजरने नुकताच एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये 1983 मध्ये भारतीय क्रिकेटपटूंनी किती कमाई केली हे सांगितले आहे.

माजी भारतीय कर्णधार कपिल देव यांना 1500 रुपये मॅच फीसह 600 रुपये रोजचा भत्ता मिळत होता.

1983 मध्ये क्रिकेटपटूंना साधारण इतकीच मॅच फी मिळायची. पण, आज बीसीसीआय खेळाडूंची निवड करते

भारतीय क्रिकेट बोर्ड हा जगातील सर्वात श्रीमंत क्रीडा संस्थांपैकी एक आहे. ते चार ग्रेडमध्ये खेळाडूंशी कॉन्ट्रक्ट करतात.

हे ग्रेड A+, A, B आणि C आहेत. C श्रेणीतील खेळाडूंसाठी वार्षिक शुल्क एक कोटी रुपये आहे.

A+ श्रेणीतील क्रिकेटपटूंना 7 कोटी रुपये, A श्रेणीतील क्रिकेटपटूंना 5 कोटी रुपये मिळतात. B श्रेणीतील क्रिकेटपटूंना 3 कोटी रुपये मिळतात.

सध्या विराट कोहली, रोहित शर्मा, रवींद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराह या चार खेळाडूंशी A+ ग्रेडचा करार आहे.

वार्षिक रिटेनरशिप व्यतिरिक्त, खेळाडूंना मॅच फी आणि भत्ते मिळतात.

यामध्ये एकदिवसीयसाठी 6 लाख रुपये, टी-20 साठी 3 लाख रुपये आणि कसोटी सामन्यासाठी 15 लाख रुपये मिळतात.

1983 च्या क्रिकेट विश्वचषक विजेत्या संघातील सुनील व्हॅल्सन यांनी सांगितले होते की, विश्वचषक जिंकल्यानंतर प्रत्येक खेळाडूला अंदाजे 25,000 रुपये मिळाले.

भारताने 1983 आणि 2011 मध्ये दोनदा ICC क्रिकेट विश्वचषक जिंकला आहे. 2003 आणि 2023 मध्ये ते दोनदा उपविजेते राहिले आहेत.