Yellow Star
Yellow Star

जास्त चहा पिण्याचे हे 5 दुष्परिणाम माहितीये? 

अॅनिमियाचा धोका

चहाच्या पानात टॅनिन भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे आपण जे अन्न घेतो त्यातील लोह पचत नाही. त्यामुळे ज्या लोकांमध्ये लोहाची पातळी कमी आहे, त्यांनी जास्त चहा पिणे टाळावे. त्यांना अॅनिमियाचा धोका असू शकतो.

तणावाचा धोका

चहाच्या पानांमध्ये कॅफिन असल्याने ते अनेकांसाठी चिंता, तणाव आणि अस्वस्थतेचे कारण बनू शकते. चहाच्या प्रकारानुसार आणि तयार करण्याच्या पद्धतीनुसार, एक कप चहामध्ये 11 मिलीग्राम ते 61 मिलीग्राम कॅफिन असू शकते.

निद्रानाश

कॅफिनमुळे चहा तुमच्या झोपेसाठी देखील वाईट ठरू शकतो. मेलाटोनिन नावाचा हार्मोन असतो, जो मेंदूला सिग्नल देतो. ज्यामुळे एखादी व्यक्ती झोपू शकते. मात्र, कॅफीन या हार्मोनच्या उत्पादनात अडथळा आणू शकते, ज्यामुळे झोपेचे चक्र खराब होऊ शकते.

मळमळ होण्याचा धोका

जास्त चहा पिणे देखील मळमळ होण्याचे कारण असू शकते. जर कोणी रिकाम्या पोटी भरपूर चहा पीत असेल तर त्यांना मळमळ होऊ शकते आणि त्यामुळे त्यांना उलट्या झाल्यासारखे वाटू शकते.

आतड्याच्या आरोग्यासाठी वाईट

चहा तुमच्या आतड्याच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. यामुळे आम्लपित्त किंवा छातीत जळजळ यासारख्या परिस्थिती उद्भवू शकतात. काही अभ्यासात असे म्हटले आहे की, कॅफीन अन्ननलिकेतील स्फिंक्टरवर परिणाम करते. ज्यामुळे ऍसिड रिफ्लक्स होतो आणि पोटात आम्लता वाढते.