तुम्हाला माहीत आहे का? झोप प्रिय असलेले हे 9 प्राणी
Koalaनिलगिरीच्या पानांच्या कमी पोषण आहारामुळे हा ऑस्ट्रेलियन मार्सुपियल (कोआला) दररोज 22 तास झोपू शकतो.
Slothस्लॉथ आपला बहुतेक वेळ झाडांना लटकत घालवतो आणि दररोज 20 तास झोपतो.
Giant armadillosजायंट आर्माडिलो हा एकजुटीने राहणारा प्राणी दिवसातून 18-19 तास झोपतो.
Pythonअजगर हा असा प्राणी आहे, तो झोपताना डोळे बंद करत नाहीत, पण दिवसातून तब्बल 19 तास झोपतो.
Owl monkeysनावाप्रमाणेच, घुबड माकडे रात्री जागी असतात आणि दिवसात किमान 17 तास झोपतात.
Little brown batफाकुळी/वटवाघूळ - हा निशाचर प्राणी दररोज 20 तास झोपू शकतो, प्रामुख्याने गुहा किंवा पोटमाळा यांसारख्या अंधाऱ्या आणि शांत ठिकाणी तो राहतो.
Tigersआपल्याला वाटतं मांजर खूप झोपतं, पण झोपेच्या बाबतीत वाघ हे मांजरांचे राजा असतात. त्यांना दररोज 16 तासांची झोप लागते.
Cheetahचित्त्याला त्याची गेलेली उर्जा भरून काढण्यासाठी भरपूर विश्रांतीची आवश्यकता असते. तो दररोज सुमारे 12 तास झोपू शकतो.
Squirrelsआपल्याला नेहमी लगबगीनं कामात दिसणारी खारूताई दिवसातून 15 तास झोप काढते.