भोपळ्याच्या सालीचे हे जबरदस्त फायदे माहितीये? आरोग्यावर करते जादू
आपण भाजीची साल सहसा फेकून देतो. भोपळ्याची सालही त्यापैकीच एक आहे.
मात्र ही साल खूप फायदेशीर असते. कारण त्यात भरपूर जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात.
तज्ज्ञांच्या मते, दुधी भोपळ्याच्या सालीमध्ये सालीमध्ये भरपूर व्हिटॅमिन बी1, व्हिटॅमिन बी2, व्हिटॅमिन बी3, व्हिटॅमिन बी5 असते.
तसेच व्हिटॅमिन बी 6, लोह, कॅल्शियम, जस्त, लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि मँगनीजदेखील असते.
दुधीची साल खाल्ल्याने गॅस, अपचन, मूळव्याध या समस्या कमी होतात. यामध्ये भरपूर फायबर असते, जे गॅस आणि बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी प्रभावी आहे.
मुळव्याधची समस्या सोडवण्यासाठी दुधी भोपळ्याची साल कापून कोरडी करा. आता वाळलेल्या सालीची पावडर बनवा. दिवसातून दोनदा थंडीत याचे सेवन करा. मूळव्याधचा त्रास कमी होईल.
उन्हाळ्यात पायांच्या तळव्यांना खूप जळजळ होते. ही जळजळ कमी करण्यासाठी दुधी भोपळ्याची साल वापरता येते. यासाठी सालीचा रस वापरा.
केसांच्या समस्या कमी करण्यासाठीही दुधीची साल वापरता येते. फोलेट, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, लोह आणि जस्त यांसारखे पोषक घटक केसांचे पोषण करतात.