माशांचं सूप आणि भात खाल्ल्यानंतर शरीरात काय होते माहितीये?

मासे खायला अनेक लोकांना आवडतात. पण रोज माशांचं सूप आणि भात खाणे शरीरासाठी किती फायदेशीर आहे हे तुम्हाला माहिती आहे का?

स्मरणशक्ती आणि मेंदूचे पोषण सुधारण्यात माशांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. असे अनेक अभ्यास सांगतात. विशेषतः तेलकट माशांमधील ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. 

अमेरिकन नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या पोषणतज्ञांनी सांगितले की, ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड मेंदूसह शरीरातील पेशी पडदा तयार करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.

संशोधनात असे दिसून आले आहे की, जे लोक आठवड्यातून तीन किंवा अधिक दिवस मासे खातात. त्यांच्या मेंदूचे न्यूरॉन्स अधिक व्यवस्थित आणि अधिक कार्यक्षम असतात.

आयोडीन, व्हिटॅमिन डी, फॉस्फरससह विविध खनिजे मेंदूला उत्तेजित करतात आणि संपूर्ण आरोग्यासाठी मदत करतात. 

मेंदू व्यतिरिक्त, हृदय निरोगी ठेवण्यासाठी आणि या दोन मुख्य अवयवांचे रक्त परिसंचरण सामान्य ठेवण्यासाठी मासे खूप उपयुक्त आहेत.

माशातील ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड हृदयरोग आणि मेंदूतील रक्ताच्या गुठळ्या रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.

जर तुम्ही शाकाहारी नसाल तर आठवड्यातून किमान तीन दिवस 70-75 ग्रॅम मासे खाण्याचा सल्ला तज्ञ देतात.

तरुण वयात स्मरणशक्ती, एकाग्रता सुधारण्यासाठी आणि वाढत्या वयात स्मृतिभ्रंश टाळण्यासाठी रोज मासे खावे.