रात्रीचं जेवण टाळताय? उपाशी झोपल्यास शरीराचे काय होते एकदा पाहाच 

तज्ञांच्या मते, जर तुम्ही तीन जेवणांपैकी एक जेवण देखील वगळले तर त्याचे तुमच्या शरीरावर घातक परिणाम होतात.

बऱ्याच लोकांना असे वाटते की, रात्री कॅलरीज बर्न होत नाही. म्हणून ते रात्री न जेवणे पसंत करतात. 

जर तुम्ही नियमितपणे रात्रीचे जेवण वगळले तर तुम्ही निद्रानाशाला लवकर बळी पडू शकता. निद्रानाशासह तुमचे मानसिक आरोग्यही बिघडेल. 

नाश्ता वगळल्याने नैराश्य आणि तणाव वाढू शकतो. स्ट्रेस हार्मोन्समुळे झोपेच्या चक्रात व्यत्यय येतो. झोपेच्या कमतरतेमुळे तुमचे एकंदर आरोग्य बिघडते. 

जे अधूनमधून रात्रीचे जेवण वगळतात, त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. परिणामी तुम्हाला चिंतेचा त्रास होऊ शकतो. 

चिंता वाढली की, रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते. तसेच शरीरातील स्ट्रेस हार्मोन्सचे प्रमाण वाढते. 

रात्रीचे जेवण न करता झोपल्यास भूक लागते. परिणामी, अन्नाची लालसा हळूहळू वाढते. त्यामुळे जंक फूड खाण्याचा ट्रेंड वाढत आहे. 

जेव्हा तुम्ही न जेवता झोपता तेव्हा यकृत बराच काळ रिकामे असते. त्यामुळे तुमची कार्यशक्ती झपाट्याने कमी होते. परिणामी, सकाळी उठल्यानंतर थकवा वाढतो.