आपल्या देशात कोरोना महामारीने सर्वसामान्यांपासून ते श्रीमंतांपर्यंतचं आर्थिक नियोजन ढसाळलं होतं.
देशाच्या लोकसंख्येनुसार सरकारी तसेच खाजगी दवाखाने आरोग्य सेवा देण्यासाठी कुठेतरी कमी पडतात.
महागाईच्या काळात सर्वसामान्यांना महागडे दवाखाने परवडत नाहीत.
यासाठी पुण्यातील एका डॉक्टरने 1 रुपयांत दवाखाना ही आरोग्य सेवा सुरू केली आहे.
गोरगरीब जनतेसाठी हा 1 रुपयांचा दवाखाना वरदान ठरत आहे.
डॉक्टर रोहित बोरकर मुळचे हिंगोलीचे असून पुण्यात स्थायिक आहेत.
त्यांनी आपल्या सत्यशिव ग्लोबल फाउंडेशन यांच्या माध्यमातून पुण्यातील धानोरी परिसरात 1 रुपयामध्ये दवाखाना सुरू केला आहे.
1 रुपयांत दवाखाना या आरोग्य सेवेत नागरिकांना OPD, ECG, Sugar, IV saline, Nebulization, General medicine अशा सुविधा मिळतील.