बिअर प्यायल्याने कोलेस्ट्रॉल कमी होतं का?

अनेक लोकांना उन्हाळ्यात बिअर प्यायला आवडते.

काही लोकं म्हणतात की, बियर प्यायल्याने कोलेस्ट्रॉल कमी होत.

परंतू बियर खरंच कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मदत करते का याविषयीचं सत्य जाणून घेऊयात.

बिअरमध्ये अनेक प्रकारचे पोषकतत्व असतात. ज्यामध्ये व्हिटॅमिन बी, प्रोटीन, फायबर इत्यादींचा समावेश असतो.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार बियरमध्ये काही असे तत्व असतात जे तुमच्या लिपीड प्रोफाइलवर सकारात्मक प्रभाव टाकतात.  

परंतू हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा बियरचे सेवन मर्यादित प्रमाणात केले जाईल.

एका रिपोर्टनुसार असे समोर आले की कमी प्रमाणात अल्कोहोल प्यायल्याने चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते.

बियरमध्ये उपलब्ध हॉप्स आणि दुसरे घटक हार्टला हेल्दी ठेण्याचे काम करतात.

मात्र बिअरमध्ये अल्कोहोलचे प्रमाण जास्त असते आणि याचे सेवन जास्त केल्याने आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

बिअरच्या सेवनामुळे लिव्हरची समस्या, वजन वाढणे आणि हार्टच्या समस्या होण्याचा धोका असतो.

(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.)