मेन स्विच ON, पण डिवाइस कनेक्ट नाही, मग वीज वापरली जाते?
अशा अनेक गोष्टी आहे, ज्या आपण रिमोर्टने बंद करु शकतो.
ज्यामध्ये एसी, फ्रीज, टीव्ही, पंखा, कुलर सारख्या गोष्टी आहेत. ज्यामुळे या वस्तूंना वापरणं सोप्पं होतं.
पण अनेकदा रिमोर्टनं गोष्टी बंद केल्या तरी देखील त्याचा मेन स्विच सुरुच रहातो.
अशावेळी प्रश्न उपस्थीत रहातो की मुख्य स्विच चालू राहिल्याने वीज वापरली जाते का?
अनेकांच्या मनात असा प्रश्न आहे. चला याबद्दल थोडी माहिती घेऊ.
मेन स्वीच चालू असेल तर विजेचा वापर होते हे निश्चित आहे.
बीजली बचाओ डॉट कॉमच्या अहवालानुसार, हा वापर त्या गॅझेटमध्ये (वस्तूमध्ये) वापरल्या जाणाऱ्या विजेच्या 7 ते 10 टक्के इतका आहे.
म्हणजेच, जर तुमचा एसी एका तासात एक युनिट वीज वापरत असेल, तर मुख्य स्विच चालू असताना एका युनिटपैकी 7 ते 10 टक्के वीज वापरली जाईल.
घरातील काही वस्तू सर्वाधिक वीज वापरतात. यामध्ये एसी पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर फ्रिजचा क्रमांक येतो. यानंतर जुना पंखा आणि कुलर येतो.
याशिवाय, जर तुमच्या घरात अजूनही 100 वॅटचे पिवळे बल्ब लावले असतील तर ते जास्त वीज वापरतात.