उन्हाळा सुरू झाला की थंडगार गोळा खाण्याचा आनंद अनेकांना हवाहावासा वाटतो. डोंबिवलीतील राधे मलाई गोला सेंटर हे ठिकाण खवय्यांचं आकर्षण केंद्र आहे.
1997 पासून हा मलाई गोळेवाला स्टॉल तिथेच असून हा स्टॉल सांभाळणारी ही दुसरी पिढी आहे.
या गोळेवाल्याकडे 20 ते 30 प्रकारचे विविध फ्लेवरमधील गोळे खायला मिळतात. विशेष म्हणजे अगदी 40 रुपयांपासून ते 200 रुपयांपर्यंतचे हे गोळे खाण्यासाठी डोंबिवलीकर या ठिकाणी गर्दी करत असतात.
डोंबिवली पश्चिमेला स्टेशनपासून 10 ते 15 मिनिटांच्या अंतरावर असलेल्या भाग मैदानजवळ हा गोळेवाल्याचा स्टॉल आहे. राजभोग डिलक्स आणि मिक्स ड्रायफ्रूट मलाई हे गोळे इथले सर्वात अस्सल आणि खास आहेत.
या गोळ्यांमध्ये तुम्हाला ब्लू बेरी, रोझ, रबडी मलाई, बेदाणे, काजू आणि ड्रायफ्रूट सारखे अनेक फ्लेवर चाखायला मिळतील. इथे गोळ्याची किंमत 40 रुपयांपासून ते 200 रुपयांपर्यंत फ्लेवरनुसार आहे.
विशेष म्हणजे इथून तुम्हाला हवा असलेला गोळा घरबसल्या ऑनलाईन ऑर्डर करूनही मागवता येतो, अशी माहिती विक्रेत्यांनी दिली.