फक्त 30 रुपयांपासून ‘इथं’ खरेदी करा ब्लाऊज पिस!
श्रावण महिन्यात वेगवेगळ्या सणांची रेलचेल असते.
या सणाच्या निमित्तानं घरी आलेल्या महिलांची ओटी भरण्याची पद्धत आहे.
ही ओटी भरण्यासाठी अनेकदा ब्लाऊजपिस दिले जातात.
यासाठी डोंबिवलीतला खरेदीचा एक बेस्ट ऑप्शन आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
डोंबिवलीतल्या लक्ष्मी मॅचिंग सेंटरमध्ये ब्लाऊज पिसचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.
अवघ्या 30 रुपयांपासून इथं ब्लाऊज पिस खरेदी करता येतात.
पूर्वी महिला चोळी शिवत असत. त्यावेळी उरलेले कापड आणि काठ स्वतः च्या हाताने शिवून ही चोळी शिवत असे.
त्यामुळे पूर्वीपासूनच महिला खणाच्या कापडाला अधिक पसंती देतात.
ब्लाऊज पिस म्हणून देखील खणाचे कापड वापरतात.
तीन ते चार वर्षांपासून खणाच्या कापडाला जास्त मागणी वाढली आहे, अशी माहिती या दुकानाचे मालक संदीप रवानी यांनी दिलीय.