पोट आणि जीभेला तृप्त करणारा ‘रिफ्रेश कट्टा’

पोटभर आणि चमचमीत खाल्ल्यानंतर खवय्ये नेहमीच ताजेतवाने होतात.

त्यात पिझ्झा, बर्गर, हॉट डॉग आणि फ्रॅन्की आदी चमचमीत पदार्थ हे तरुणाईचे विशेष आवडते आहेत.

डोंबिवलीतल्या एका तरुणानं हीच आवड लक्षात घेऊन स्वत:चा व्यवसाय सुरु केला.

डोंबिवली पूर्व येथे राहणाऱ्या आणि बिकॉम झालेल्या प्रतिक क्षीरसागर यांनी रिफ्रेश कट्टा हा तरुणांचा आवडीचा कट्टा आहे.

प्रतीकला सुरुवातीपासूनच स्वतःचा व्यवसाय करायची मनापासून इच्छा होती.

त्यानं खाद्य पदार्थांचा कट्टा सुरू करण्याचं ठरवलं. त्यानंतर या ठिकाणी फ्रॅन्की बनवून त्याची विक्री सुरू केली.

ग्राहकांनी त्याला खूपच चांगला प्रतिसाद दिला. त्यानंतर प्रतीकने बर्गर, गार्लिक ब्रेडची पाककला शिकून घेतली आणि खवय्यांना आपलेसे केले.

त्याच्या या रिफ्रेश कट्ट्याला आता सात वर्ष पूर्ण झाली असून त्याचा हा कट्टा अजूनही तरुणांना रिफ्रेश करतो.

कुठं खाणार? गणेश मंदिराजवळ, फडके रोड, डोंबिवली (पूर्व)