कचऱ्यात चुकूनही फेकू नका घरातील 'या' वस्तू, नाहीतर जावं लागेल जेलमध्ये
घरात दररोज वेगवेगळ्या प्रकारचा कचरा तयार होतो, ज्याला आपण बाहेर फेकतो. .
ज्यामध्ये भाजीचे देठं, धूळ, घरातील विविध टाकावू वस्तू यांचा समावेश होतो
मात्र आपल्या घरात अशाही काही वस्तू असतात, ज्यामुळे पर्यावरणाची हानी होऊ शकते, अशा वस्तू चुकूनही कचऱ्यात टाकू नका.
यामध्ये सर्वाधिक खतरनाक हा ई- वेस्टचा कचरा असतो. असा कचरा जर तुम्ही उघड्यावर टाकला तर अमेरिकेमध्ये तुम्हाला दंड होतो.
बॅटरी - बॅटरीची निर्मिती केमिकलपासून होते, त्यामुळे बॅटरी कचऱ्यात टाकल्यास तुम्हाला न्यूयार्कमध्ये 16 हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो.
टीव्ही - अमेरिकेमध्ये तुम्ही जर टीव्ही, रेडिओ कचऱ्यामध्ये फेकला तर तुम्हाला आठ हजारांपर्यंत दंड होऊ शकतो.
स्मार्टफोन - स्मार्टफोन, बॅटरी यांचा समावेश हा ज्वलनशील पादर्थांमध्ये होतो, अशा वस्तू कचऱ्यात उघड्यावर फेकल्या तर त्यामुळे आग लागण्याची शक्यता असते.
वाहनामधून निघालेलं ऑईल - असं ऑईल जर कचऱ्यामध्ये फेकलं तर अमेरिकेत तुम्हाला 200
डॉलरचा दंड तसेच दोन वर्षांपर्यंत
जेलही होऊ शकतं
मायक्रो ओव्हन - याचा देखील समावेश ई- वेस्टमध्ये होतो, अमेरिकेमध्ये खराब झालेलं मायक्रो ओव्हन कचऱ्यात टाकण्यास बंदी आहे