लिफ्टमध्ये अडकलात तर 'या' चुका करु नका

लिफ्टमध्ये बिघाड झाल्याच्या अनेक बातम्या समोर आल्या आहेत. अशा वेळी काय करावं हे लोकांना ठावूक नसतं

नोएडामध्ये लिफ्टशी संबंधित एक भीषण दुर्घटना घडली आहे.

अपघातात लिफ्ट खाली जाण्याऐवजी वर जाऊन छताला धडकली आणि वरच्या छतामधून बाहेर आली.

असे प्रकार ऐकून लोकांना भिती वाटू लागते की असा प्रकार आपल्यासोबत घडता कामा नये.

लिफ्टमध्ये अडकल्यास घाबरू नका आणि शांत राहण्याचा प्रयत्न करा.

लिफ्टमधील अलार्म बटण दाबा आणि कोणीतरी प्रतिसाद देण्याची प्रतीक्षा करा.

इतर कोणतीही बटणं दाबू नका, पॅनिक होऊ नका आणि उड्याही मारु नका.

उडी मारल्याने लिफ्टच्या स्टॅबिलायझर प्रणालीवर परिणाम होऊ शकतो.

लिफ्ट अचानक बंद पडल्यास, लिफ्टचे दरवाजे स्वत: उघडण्याचा प्रयत्न करू नका.