झोपण्यापूर्वी पाणी पिणं फायद्याचं की धोकादायक?

आपल्या शरीराला पाण्याची सर्वाधिक गरज असते. अशा परिस्थितीत योग्य प्रमाणात पाणी पिणे आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे.

प्रौढांनी दिवसातून 3 ते 4 लिटर पाणी प्यावे. पण, रात्री झोपण्यापूर्वी पाणी पिण्याबाबत वेगळा सल्ला दिला जातो.

रात्री झोपण्यापूर्वी पाणी प्यावे की नाही? प्यायचेच असेल तर किती पाणी प्यावे? चला पाहूया. 

रात्री झोपण्याच्या 2 तास आधी पाणी पिणे गरजेचे आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे. ज्यामुळे अन्न पचायला सोपे जाते. 

याशिवाय जीवनसत्त्वे आणि खनिजेही पाण्यामुळे शरीरात शोषली जातात. पाणी प्यायल्याने चयापचय व्यवस्थित राहते. 

रात्री झोपायला जाताना पाणी पिऊ नये. हे आरोग्यासाठी चांगले मानले जात नाही. 

जे लोक कमी पाणी पितात त्यांच्या शरीरात अनेक समस्या येतात. या कारणामुळे डिटॉक्सिफिकेशन होत नाही.

दिवसा जास्त पाणी आणि रात्री झोपण्याच्या काही तास आधी पिणे चांगले.

मधुमेही रुग्ण आणि हृदयरोगीनी रात्री झोपण्यापूर्वी जास्त पाणी पिऊ नये.

झोपण्याच्या 1 ते 2 तास आधी पाणी प्यावे. जेणेकरून झोपण्यापूर्वी ते शरीरातून एक-दोन तासांत बाहेर येईल. यामुळे तुमची रात्रीची झोप खराब होणार नाही.