हेडफोन-इअरफोनचा वापर घातक, महत्त्वाची माहिती!
सध्याच्या काळात मोबाईलचा वाढता वापर हा शरीरासाठी नुकसानदायी आहे.
पण यासोबतच हेडफोन आणि इअरफोनचेही तोटे आहेत.
लहानांपासून मोठ्यांपर्यंत गाणे ऐकण्यासाठी तसेच चित्रपट वगैरे पाहण्यासाठी हेडफोन-इअरफोनचा वापर केला जातो.
अनेक तास याला कानात लावून ठेवल्याने अनेक प्रकारचे आजार होत आहेत.
यामुळे ऐकू येण्याची क्षमता कमी होण्याची शक्यता आहे.
सातत्याने हेडफोनचा वापर करणे तुमच्या हृदयासाठीही धोकादायक आहे.
यातून निघणारी इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह ही मेंदूवर चुकीचा प्रभाव टाकू शकते.
यामुळे तुम्ही डोकेदुखी आणि मायग्रेनचे शिकार होऊ शकतात.
इतकेच नव्हे तर स्लीप एपनिया या आजाराचाही शिकार होऊ शकतात.
तसेच यामुळे व्यक्तीला चिंता किंवा तणावाची समस्या होऊ शकते.