Banana : केळी ताजी ठेवण्यासाठी सोपी ट्रिक

केळ जास्त दिवस टिकवण्यासाठी तुम्ही ट्रिक वापरु शकता. जेणेकरुन जास्त दिवस केळ टिकून राहतील.

दैनंदिन आहारात अनेकजण फळांचा समावेश करतात. यामध्ये केळ हे हमखास असतंच.

अनेकदा ही फळे लवकर खराब होतात मग त्यांना फेकून द्यावं लागतं.

केळी जास्त दिवस टिकवण्याविषयी सीई सेफ्टीचे संचालक गॅरी एलिस यांनी ट्रिक सांगितलीय.

गॅरी एलिस यांनी सुपर हॅक सांगितला आहे. ज्यामुळे केळी 10 दिवस पूर्णपणे पिकलेली राहतील आणि तपकिरी-काळे डाग पडू देणार नाहीत.

केळी इतर फळांपासून पूर्णपणे वेगळी ठेवावीत. यामुळे त्यात बाहेर पडणाऱ्या इथिलीन वायूचे उत्पादन कमी होईल आणि तपकिरी डाग पडणार नाहीत.

केळी इतर फळांसह ठेवल्यास अधिक लवकर पिकू लागतात आणि खराब होतात.

एलिसच्या म्हणण्यानुसार तुम्ही केळ फ्रिजमध्ये ठेवू शकता.

याशिवाय केळी धुवून वाळवणे आणि त्याच्या देठाला ओलं कापड गुंडाळणं. असं केल्यानं केळी लवकर पिकणार नाही.