उन्हाळ्यात अंड खाव की नाही?

अंड हा प्रोटिन्सचा उत्तम स्रोत मानला जातो.

नियमित व्यायाम आणि डाएट करणाऱ्यांच्या आहारात अंड्यांना महत्त्व दिलं जातं.

अनेकजण उन्हाळा सुरु होताच अंडं किंवा अंड्याचे पदार्थ खाणं बंद करतात. हे योग्य की अयोग्य ते जाणून घेऊया.

 उन्हाळ्यात दररोज एक किंवा दोन अंडी खाणं योग्य आहे मात्र त्यापेक्षा जास्त प्रमाणात अंडी खाणं टाळावं.

काहीजण डाएट म्हणून दररोज चक्क अर्धा डझन किंवा एक डझन अंडीही खातात.  तुम्हीही दररोज अशीच भरपूर अंडी खात असाल तर उन्हाळ्यात त्यावर थोडं नियंत्रण आणायची गरज आहे.

उन्हाळ्यात उकडलेलं अंड किंवा ऑमलेट खायला हरकत नाही.

डाएटिशियन्सच्या मते अंड्यात भरपूर प्रोटीन आणि कॅल्शियम असतं. त्यामुळे हाडं बळकट होतात.

ल्यूटिन आणि जेक्सेंथिन सारखी ॲंटीऑक्सिडंट्सही अंड्यांतून मिळतात. त्यांच्यामुळे डोळ्यांच्या रेटिनामधील मळ स्वच्छ होण्यास मदत होते आणि मोतीबिंदू होण्याची शक्यताही कमी होते.

अंड्यांमधून मिळणारी प्रोटीन्स ही सर्वोत्तम दर्जाची प्रोटीन्स मानली जातात. त्यामुळेच आहारात नियमित अंड्यांचा समावेश करण्याचा सल्ला डाएटिशियन्स देतात.

सदर मजकूर हा इंटरनेटवर लिहिलेल्या माहितीच्या आधारे आहे. आहारात बदल करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

बातमी वाचण्यासाठी हेडिंगवर क्लिक करा