उन्हाळ्यात अंजीर खावं की नाही?

उन्हाळ्यात वातावरणातील तापमान हे जास्त असल्याने शरीराला थंडावा मिळावा यासाठी अनेकजण थंड पदार्थ खाण्याकडे वळतात.

अंजीर हा मुळतः गरम पदार्थ आहे. त्यामुळे उन्हाळ्यात याचे सेवन करावे की नाही असा प्रश्न अनेकांना पडतो.

अंजीरमध्ये प्रोटीन आणि फायबरचे प्रमाण भरपूर असते.

अंजीरच्या सेवनाने शरीराला व्हिटॅमिन ए, सी, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, आयरन, फायबर यासारखी पोषकतत्व मिळतात.

चांगले आरोग्य लाभण्यासाठी आहारतज्ज्ञ अंजीर खाण्याचा सल्ला देतात.

उन्हाळ्यात तुम्ही प्रत्येक दिवशी २ ते ३ अंजीरचे सेवन करू शकता.

परंतु उन्हाळ्यात सुके अंजीर खाण्यापेक्षा ते पाण्यात भिजवून मग त्याचे सेवन करावे.

सकाळी रिकाम्यापोटी अंजीर खाल्ल्याने बद्धकोष्ठता, हाय ब्लड प्रेशर सारख्या समस्या दूर होतात.

सदर मजकूर हा इंटरनेटवर दिलेल्या माहितीच्या आधारे आहे. तेव्हा आहारात बदल करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.