सकाळी उपाशीपोटी फळे खाणं योग्य की अयोग्य?

सकाळी उपाशीपोटी फळे खाणं योग्य की अयोग्य?

आरोग्यादायी जीवनासाठी फलाहार महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे ऋतुमानानुसार फळे खाणं गरजेचं असतं. 

कोल्हापूरच्या आहार तज्ज्ञ स्नेहल पै यांनी सकाळी उपाशीपोटी फळं खाणं योग्य की अयोग्य याबाबत माहिती दिलीय.

फळे ही शरीरासाठी लाभदायीच असल्याने ती उपाशीपोटी खाल्ली तरी आरोग्यदायीच असतात. 

सकाळी उपाशी पोटी फळे खाणे कधीही चांगलेच मात्र सकाळच्या नाष्ट्या ऐवजी फक्तच फळे खाणे अयोग्य आहे. 

आपल्या शरीराला सकाळी ऊर्जेची गरज असते आणि ती फक्त फळांच्या सेवनाने पूर्ण होऊ शकत नाही. 

अशावेळी फळांसोबत उकडलेली अंडी किंवा मोड आलेली कडधान्य खावीत, असेही पै सांगतात. 

रात्री झोपण्याआधी, जेवणासोबत किंवा जेवणानंतर लगेच फळे खाणे टाळावे. 

ज्यांना अ‍ॅसिडिटीचा खूप त्रास होत असतो त्यांनी देखील सकाळी उपाशीपोटी फळे खाऊ नयेत. 

उन्हाळ्यात केसांसाठी आरोग्यदायी कोरफड