पॅकेटमधील नॉनवेज पदार्थाखात असाल तर सावधान!
तुम्हाला देखील मार्केटमधील पॅक केलेले मांस खाण्याची सवय आहे का?
आजकाल मार्केटमध्ये तुम्हाला हवं तसं आणि त्या भागाचं नॉनवेज उपलब्ध आहे. जसं की ब्रेस्ट, लेग, लॉलीपॉप
पण यांना खरेदी करण्यापूर्वी ही बातमी तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे
दक्षिण कॅरोलिनामध्ये राहणाऱ्या 34 वर्षीय रेचेलने सुपरमार्केटमधून सॅल्मन फिश खरेदी केले.
पण त्याला पॅकेटमध्ये एक किडा फिरताना दिसला, त्यानंतर तिने लगेच त्याचा फोटो काढला
या पाकिटात एक छोटा पांढरा रंगाचा किडा फिरताना दिसला.
पाकिटावर लिहिल्या एक्स्पायरी डेटनुसार फिश ताजे होते.
पण तरीही याच्या आतमध्ये किडे दिसले, जे किळसवाणं आहे.
महिलेने लगेच पॅकेट परत केले आणि लोकांना खरेदी करण्यापूर्वी काळजी घेण्याचा सल्ला दिला.