तुम्ही आय ड्रॉप्सच्या चुकीच्या पद्धतीने वापर करता का?

सध्या हवेतील प्रदूषणाची पातळी वाढत आहे.

त्यामुळे डोळ्यांच्या समस्याही वाढत आहेत.

याशिवाय मोबाईल आणि टीव्हीचा अतिवापर करणेही डोळ्यांसाठी हानिकारक आहे.

डोळ्याच्या किरकोळ दुखापती किंवा काचबिंदूसाठी आय ड्रॉप्स वापरले जातात.

त्याकडे थोडासा निष्काळजीपणा देखील हानिकारक आहे.

डोळ्याच्या कोणत्याही ड्रॉप्सचे किंवा सिरपचे सील उघडताच त्याची तारीख आपल्याकडे लिहून ठेवा.

त्या तारखेच्या एका महिन्यानंतर ते ड्रॉप्स वापरू नये - डॉ सुनील यादव.

सील उघडल्यानंतर ठराविक वेळेनंतर आय ड्रॉप्स दूषित होतात.

आय ड्रॉप्स वापरण्यापूर्वी हात सॅनिटायझर किंवा साबणाने धुवा.

आय ड्रॉप्स केवळ निर्धारित तापमानातच साठवले पाहिजेत.