पावसाळ्यात लाकडाचे दरवाजे फुगून जाम झालेत? करा हे उपाय

अनेकदा लाकडी खिडक्या, दरवाजे हे पावसाळ्यात फुगून जाम होतात.

काही सोप्या टिप्स सांगणार आहोत ज्यामुळे जाम झालेल्या गोष्टी लगेच उघडण्यास मदत होईल.

पावसाळ्यात दरवाजा उघडण्यात अडचणी येत असतील तर याच कारण पाणी असू शकत.

लक्ष द्या की दरवाजातील लाकडाचा कोणताही भाग तुटलेला नसावा.

तुम्ही थोडं मोहरीचं तेल टाका. मग ते अगदी लगेच उघडण्यास मदत होईल.

खिडकी आणि दरवाजे पावसात भिजले तर पाऊस थांबल्यावर लगेचच ते पुसून टाका.

ओलावा राहिल्याने लाकूड खराब होते. दरवाजे सुकवण्यासाठी तुम्ही त्यांच्या समोर टेबल फॅन लावू शकता किंवा हेअर ड्रायरने त्यांना सुकवू शकता.

तसेच दरवाजाच्या कडीला सुद्धा नीट पुसून घ्या जेणेकरून त्यांना जंग लागणार नाही.

खिडकी आणि दरवाज्याच्या कड्या जाम झाल्या असतील तर त्यावर मोहरीचं तेल आणि मेणबत्ती वापरा.

मेणबत्ती आगीने वितळवून कड्यांवर ओतून मिनिटभर चोळा.

मोठ्या प्रमाणात जाम झालेले दरवाजे आणि खिडक्या आवाज न करता व्यवस्थित उघडू लागतील.

जंग दूर करण्यासाठी तुम्ही सॅंड पेपरचा वापर करू शकता. याला गंज लागलेल्या कड्यांवर घासाल तर दरवाजे आणि खिडक्या अगदी सोप्या पद्धतीने उघडतील.

पावसाळ्यात घराच्या खिडकी आणि दरवाजे यांना नियमितपणे साफ करा.

दरवाज्यांचे नट अनेकदा सैल होतात. तेव्हा हे नट नियमित तपासत राहा.

बातमी वाचण्यासाठी हेडिंगवर क्लिक करा