देशातील प्रसिद्ध 12 सूर्यमंदिरे, पहा कलेचा अप्रतिम नजारा

कोणार्क सूर्य मंदिर हे मंदिर 13 व्या शतकात बांधले गेले असून त्याच्या क्लिष्ट कलाकृती, आयकॉनोग्राफी आणि रचनेसाठी प्रसिद्ध आहे.

मोढेराचे सूर्य मंदिर 11 व्या शतकात बांधलेल्या या मंदिराच्या खांबांच्या गोलाकार भागांमध्ये स्त्री-पुरुषांच्या सांसारिक जीवनाची दृश्ये आहेत.

मार्तंड सूर्य मंदिर, काश्मीर 8 व्या शतकात बांधलेले, मार्तंड सूर्य मंदिर हे काश्मिरी पंडितांसाठी पवित्र तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे.

सूर्य मंदिर, ग्वाल्हेर भारतातील प्रसिद्ध उद्योगपती जी.डी. बिर्ला यांनी बांधलेले हे मंदिर ओडिशातील कोणार्क येथील प्रसिद्ध सूर्य मंदिराची प्रतिकृती आहे.

बालाजी सूर्य मंदिर, उनाव मध्यप्रदेशातील उनाव येथील सूर्य मंदिरात रविवारी विशेष प्रार्थना केली जाते.

सूर्य मंदिर, गया हे मंदिर भव्य रथाच्या रूपात आहे. अठरा विशिष्ट डिझाइन केलेली चाके आणि सात घोडे जुंपलेल्या स्वरुपात आकर्षक दिसतात.

सूर्य मंदिर, उत्तराखंड 9 व्या शतकात कटुरी राजांनी बांधलेल्या दुर्मिळ सूर्य मंदिरासाठी कटारमल गाव ओळखले जाते.

सूर्यपहार मंदिर आसाममधील या सूर्यमंदिरात हिंदू, बौद्ध आणि जैन धर्माची असंख्य शिल्पे आणि इतर अवशेष सापडले आहेत.

Black Section Separator

सूर्यनारायण मंदिर, डोमलूर डोमलूर, बंगलोर येथील श्री सूर्य नारायण स्वामी मंदिर हे भारतातील काही मोजक्या सूर्यदेव मंदिरांपैकी एक आहे.

दक्षिणार्क सूर्य मंदिर गया येथील दक्षिणार्क सूर्य मंदिराचा उल्लेख हिंदू धार्मिक ग्रंथ वायु पुराणातही आहे.

सूर्यनार कोविळ तामिळनाडूमध्ये असलेले हे सूर्य मंदिर कुलतुंगा चोलदेवाच्या काळात बांधले गेले.

अर्सावल्ली सूर्य मंदिर पद्म पुराणानुसार मानवजातीच्या कल्याणासाठी ऋषी कश्यप यांनी येथे सूर्यनारायणाची मूर्ती स्थापित केली.