नाशिकच्या ‘या’ टॉप 6 मिसळ खाल्ल्या आहेत का? 

मिसळ म्हटलं की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. नाशिकमध्ये आल्यावर अनेकजण मिसळ नक्की खातात.

नाशिक शहरातील सर्वात फेमस मिसळ कोणत्या आहेत ते पाहूया

साधना मिसळ : अस्सल चुलीवरची झणझणीत लाल काळया रस्साची ही मिसळ आहे.

ग्रेप एम्बसी मिसळ : निसर्गरम्य वातावरणात द्राक्ष बागेत या मिसळचा आस्वाद तुम्हाला घेता येतो.

श्री सोमनाथ मिसळ : येथील मिसळीचं वैशिष्ट्य म्हणजे इथं घरगुती मसाले वापरले जातात.

सिताबाईची मिसळ : चुलीवरची झणझणीत मिसळीसोबत मिळणारा लाल रस्सा येथील आकर्षण आहे.

पेरुची बाग मिसळ : निसर्गरम्य वातावरणात पेरूच्या बागेत तुम्हाला मिसळचा आस्वाद घ्यायला मिळतो.

हॉटेल रिलॅक्स कॉर्नर : भिमाबाईंची ही फेमस मिसळ आहे.विशेष म्हणजे इथे मिसळचा आस्वाद घेताना पुस्तकांची देखील मेजवानी मिळते.