चहा हे पेय जरी आरोग्यास हानिकारक असल्याचे म्हटले जात असेल तरी अनेक गुणकारी आणि आरोग्यदायी असे चहा देखील प्यायला मिळतात.
कोल्हापुरातल्या एका हॉटेलमध्ये देखील एक आरोग्यास गुणकारी असा चहा मिळतो.
गेल्या 82 वर्षांपासून हा चहा कोल्हापूरकरांच्या चवीची आणि आरोग्याची काळजी घेत आहे.
चहा बनवण्याच्या पद्धतीवरूनच या चहाला बंबातला चहा अशी ओळख मिळालेली आहे.
View All Products
कोल्हापुरातील पापाची तिकटी चौकात साधारण 1941 सालच्या आसपास सूर्यकांत हॉटेल सुरू झाले. परशराम नायकु पाटील यांनी या हॉटेलची स्थापना केली.
अगदी सुरुवातीपासून ते आजतागायत हॉटेलमध्ये बनवल्या जाणाऱ्या सर्वच पदार्थांची चव कायम राखण्यात आली आहे.
या बंबातल्या स्पेशल चहाची ख्याती ऐकून दूरदूरवरून लोक या ठिकाणी येत असतात.