इथं मिळतात गरमागरम रस्सा पोहे

इथं मिळतात गरमागरम रस्सा पोहे

प्रत्येक गावात किंवा शहरात एखादं नाश्ता सेंटर खूप फेमस असतं आणि तिथं नेहमीच खवय्यांची गर्दी दिसते. 

गरमागरम कांदा पोहे रोजच्या नाश्त्यातील आणि अनेक कार्यक्रमांतील आवडता पदार्थ असतो. 

वेगवेगळ्या प्रकारचे पोहे आपण पाहिले असतील. पण आपण कधी रस्सा पोहे ट्राय केलेत का? 

छत्रपती संभाजीनगरमध्ये अजबनगर ते क्रांती चौक रस्त्यावर बालाजी नाश्ता सेंटर आहे. 

या ठिकाणचे रस्सा पोहे प्रसिद्ध असून ते खाण्यासाठी खवय्ये मोठी गर्दी करतात. 

पहाटे 4 पासूनच सुरू होणाऱ्या या नाश्ता सेंटरवर पोह्यासोबत रस्सा, दही आणि लिंबूही देतात. 

पोहे बनवण्यासाठी चांगल्या प्रतीचे पोहे, शेंगदाणे, जिरे, कडीपत्ता, कोथिंबीर वापरली जाते.

इथे सकाळी चार वाजल्यापासून पोहे हे बनवले जातात तर ते दुपारी एक दीड पर्यंत भेटतात. 

अनेक वर्षांपासून प्रसिद्ध असणाऱ्या या पोह्यांची एक प्लेट 15 रुपयांना मिळते.

आमच्याकडे विविध नाश्ता असला तरी रस्सा पोह्यांना खूप गर्दी असते, असे मालक राजू सराटे सांगतात.