डाळिंब शेतीतून शेतकरी लखपती!

सध्याच्या घडीला राज्यातील अनेक शेतकरी पारंपरिक शेतीला फाटा देत आधुनिक शेतीकडे वळत आहेत.

यामध्ये फळांच्या शेतीतून चांगला नफा मिळवत आहेत.

बीड जिल्ह्यात देखील फळ शेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. डाळिंबासोबतच इतर फळांच्या बागा देखील शेतकऱ्यांनी लावल्या आहेत.

जिल्ह्यातील पांढरवाडीचे शेतकरी अशोक मसुराम जाधव यांनी आपल्या शेतात डाळिंबाची लागवड केली.

यामधून जेमतेम उत्पन्न हाती येईल अशी आशा होती. मात्र तीन एकरामध्ये जवळपास आता साडेसात लाख रुपयांचे उत्पन्न त्यांना मिळाले आहे.

आधुनिक शेतीची माहिती मिळाल्यानंतर त्यांना फळांची शेती करायची होती.

मात्र, डाळिंबासाठी लागणाऱ्या पाण्याची व्यवस्था अशोक यांच्या शेतात नव्हती. तेव्हा त्यांनी एका राष्ट्रियीकृत बँकेकडून सिंचनासाठी कर्ज घेतले.

बांबू लागवडीसाठी 7 लाखाचं अनुदान