दुष्काळी भागात शेतकऱ्याने पिकवलं सफरचंद

दुष्काळी भागात शेतकऱ्याने पिकवलं सफरचंद

सफरचंदाची शेती म्हटलं की आपल्याला बर्फाळ काश्मीरमधील बागा आठवतात.

पण सातारा जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त माण तालुक्यातील शेतकरी जालिंदर दडस यांनी एक एकर क्षेत्रामध्ये सफरचंदाची शेती केली आहे.

त्यांचा हा प्रयोग यशस्वी झाला असून यामधून त्यांना लाखोंचे उत्पन्न मिळत आहे.

सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात असलेल्या टाकेवाडी हे जालिंदर दडस यांचे गाव आहे.

जालिंदर दडस यांनी युट्युबवर माहिती घेऊन काश्मीर, राजस्थान आणि बाहेरील देशातून म्हणजे हॉलंड आणि इटलीमधून चार जातींची रोपे सुरुवातीला मागवली.

एका एकरामध्ये चार जातींच्या 500 हून अधिक झाडांची लागवड त्यांनी केली. त्यांच्या एका झाडाला दीडशे किलो माल तयार होत आहे.

त्यामुळे या सफरचंदाच्या लागवडीतून महिन्याला 50 ते 60 हजार रुपयांचे उत्पादन त्यांना होत आहे.

तर वार्षिक 6 ते साडेसात लाख रुपयांचे उत्पादन होत असल्याचे जालिंदर दडस यांनी सांगितले.

हमाल कसा झाला उद्योगपती?