भंगारातून बनवली विंटेज कार

कष्ट, सातत्य, जिद्द आणि मेहनत असली की आपण यशाचे शिखर गाठू शकतो असं म्हटलं जातं.

याचाच प्रत्यय पुण्यातील एका शेतकऱ्याला आलाय.

पुण्यातील शेतकऱ्याने आलिशान अशी ई- विंटेज कार भंगारातून बनवली आहे.

त्यामुळे या शेतकऱ्याचे अवघ्या पुणे जिल्ह्यात कौतुक होत आहे.

लहानपणापासूनच शेतकरी रोहिदास नवघणे यांना काहीतरी वेगळं करून दाखवण्याची जिद्द होती.

शेतकरी कुटुंबात जन्मलेले नवघणे हे शेती उपयोगी यंत्र जुगाडातून बनवायचे.

मेक इन इंडियातुन नवघणे यांना कार बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळालं.

चक्क विजेशिवाय चालतेय पिठाची गिरणी