रेशीम शेतीतून महिन्याकाठी 4 लाखांचे उत्पन्न

रेशीम शेतीतून महिन्याकाठी 4 लाखांचे उत्पन्न

मराठवाडा हा भाग दुष्काळग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो. या भागात पाऊस कमी पडत असल्यामुळे शेती करणं अवघड जाते.

पारंपरिक शेती केली तर पाहिजे तसे उत्पन्न भेटत नाही. म्हणून याचं पारंपारिक शेतीला फाटा देत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने रेशीम शेतीचा प्रयोग केला.

त्याचा हा प्रयोग यशस्वी झाला असून यामधून लाखोंची कमाई होत आहे.

View All Products

Arrow

पैठण तालुक्यातील केकत जळगाव या छोट्याशा गावातील शेतकरी संतोष वाघमारे हे रेशीम शेती करून आज महिन्याला लाखों रुपयांचे उत्पन्न कमवत आहेत.

संतोष यांनी एम.ए. पर्यंत शिक्षण घेतलेले आहे. संतोष यांचे आई-वडील हे शेतीच करत होते.

संतोष यांना असं वाटलं की आपण शेतीमध्येच वेगळा प्रयोग करावा म्हणून त्यांनी रेशीम शेती करण्याचे ठरवलं.

रेशीम शेती कशी करायची याचे आधी त्यांनी मार्गदर्शन घेतलं आणि शेती करायला सुरुवात केली. 2010 पासून हा व्यवसाय ते करत आहेत.

संतोष वाघमारे यांचा चॉकी सेंटर देखील आहे. यातून ते अनेक शेतकऱ्यांना चॉकी देतात.

या रेशीम शेती आणि चॉकीसेंटर मधून ते महिन्याकाठी 4 ते 5 लाखांचे उत्पन्न काढतात.

2 एकर दुष्काळी शेतीतून 75 लाखांचं उत्पन्न