… पण ती खचली नाही; ट्रॅक्टर चालवत सांभाळतीय शेतीचा कारभार

सैराट चित्रपटाच्या निमित्ताने ट्रॅक्टर चालवणारी आर्ची सर्वांनी पहिली असेल.

रील लाईफ मध्ये रोल करणे आणि रिअल लाईफ मध्ये ट्रॅक्टर चालवणे यात जमीन अस्मानाचा फरक आहे.

विशेषत: ग्रामीण भागात पुरुषांची कामं महिलांनी केली तर हाय तोबा केली जाते.

पण पतीच्या किडनी प्रत्यारोपणानंतर घरातील सर्व कामं आणि शेतीचं एकहाती व्यवस्थापन करण्याचं काम जालनामधील एक महिला करत आहे.

सीमा क्षीरसागर असं या जिगरबाज गृहिणीचं नाव आहे. त्या जालना जिल्ह्यातल्या कडवंची या गावातल्या आहेत.

सीमा यांचा 2013 साली सदानंद क्षीरसागर यांच्याशी विवाह झाला. सदानंद यांच्याकडं साडेचार एकर हलकी मध्यम शेती.

दोन वर्षांमध्ये बागेतून चांगलं उत्पन्न येऊ लागले. त्यांना या कामात आई-वडिलांसह पत्नी सीमा यांचीही मोलाची मदत मिळत होती.

याच कालावधीमध्ये सदानंद यांचं किडनी प्रत्यारोपणाचं मोठं ऑपरेशन झालं. त्यामुळे त्यांच्या कामावर मर्यादा आली.

या खडतर परिस्थितीमध्ये कंबरेला पदर खोचून सीमाताई तयार झाल्या. त्या सदानंद यांच्या मार्गदर्शनाखाली कामं करू लागल्या.

बागेत फवारणी करणे आणि वाहतुकीच्या दृष्टीनं त्या ट्रॅक्टरही चालवायला शिकल्या.

फक्त 3 रुपयांत भाजीपाला अन् फुलांची रोपं, Location काय?