3 एकर तुती लागवडीतून शेतकऱ्याची लाखोंची कमाई!

रेशीम शेती शेतकऱ्यांना फायदेशीर ठरत आहे यातून अनेक शेतकरी लाखो रुपयांचे उत्पादन देखील मिळवत आहेत.

जालना जिल्ह्यातील शेतकरी देखील याबाबतीत मागे राहिले नाहीत.

जिल्ह्यातील बोरगाव येथील शेतकरी सिद्धेश्वर ज्ञानेश्वर भानुसे यांनी तीन एकर तुती लागवड केली आहे.

या लागवडीमधून वर्षाला 12 ते 15 लाखांचा नफा कमवलाय.

दर महिन्याला लाख रुपये उत्पन्न हमखास या पिकातून त्यांना मिळते.

सिद्धेश्वर भानुसे तुती लागवड करण्यापूर्वी पारंपरिक पिकं आपल्या शेतात घ्यायचे.

मात्र त्यामधून त्यांना फारसं उत्पन्न मिळत नव्हतं.

त्यामुळे त्यांनी 2018 साली तुतीची लागवड केली. लागवड वाढवत तीन एकरपर्यंत नेली.

आता सिद्धेश्वर यांच्याकडे 3 एकर तुती लागवड असल्याने वार्षिक 12 ते 15 लाख रुपये त्यांना मिळतात.

आठवी पास तरुणाची 'या' व्यवसायातून लाखोंची कमाई